महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते – राकेश जगताप, युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
![]()
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते – राकेश जगताप
युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) : अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सर्व भारतीयांना समान हक्क व न्याय देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे कट्टर पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बँक, अमळनेरचे व्यवस्थापक राकेश जगताप यांनी केले. ते युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. राहुल निकम व प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी “निबंध लेखन कसे असावे?” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अर्बन बँकेचे संचालक व माजी व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या आगामी उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली. मा.गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिशा संदानशिव, भारती कोळी, माधुरी पाटील व डी. ए. पाटील यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन डी. ए. पाटील यांनी केले.
राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
मोठ्या गटातील स्पर्धेसाठी पुणे, मुंबई, अमरावती, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात निबंध प्राप्त झाले. विशेषतः शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लहान गटात अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मोठ्या गटातील विजेते
-
प्रथम क्रमांक : शुद्धोधन मिलिंद बागुल (धुळे) – ₹1000
(आबासाहेब व. ता. पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेविका प्रा. योगिताताई कापडणेकर यांच्याकडून प्रायोजित) -
द्वितीय क्रमांक : रुद्राणी विनोद राव राऊत (अमरावती) – ₹750
(प्रायोजक : योगराज (बाळासाहेब) संदानशिव) -
तृतीय क्रमांक : पल्लवी जगतराव शिंदे (हातेड) – ₹500
(प्रायोजक : चिंधु वानखेडे) -
उत्तेजनार्थ पुरस्कार :
-
संगीता विलास बाविस्कर (शिक्षिका, एन. टी. मुंदडा हायस्कूल, अमळनेर)
- तरन्नुम मन्सूर शेख (शिक्षिका, जी. एस. हायस्कूल, अमळनेर)
-
लहान गटातील विजेते
- प्रथम क्रमांक : रोहिणी समाधान भोई (इयत्ता ११ वी विज्ञान, आश्रम शाळा, गडखांब)
- द्वितीय क्रमांक : डिंपल कपिल पाटील (गडखांब)
- तृतीय क्रमांक : आरोही राकेश गोसावी (इयत्ता ६ वी, भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा, अमळनेर)
- उत्तेजनार्थ पुरस्कार :
- पियुष राजेंद्र मोरे (गडखांब)
- मिताली विवेक गोसावी (स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर)
सर्व विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्रे आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले. ही सर्व बक्षिसे युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास चेतन जाधव, बापूराव ठाकरे, अजय भामरे, प्रा. उषा देवरे, हृदयनाथ मोरे, पुरुषोत्तम माळी, हरिश्चंद्र कढरे, राकेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विठ्ठलनगर येथील अभ्यासिकेत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





