साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त पूज्य सानेगुरुजी ग्रंथालयात अभिवादन ,”खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे”च्या स्वरांत साने गुरुजींच्या विचारांना उजाळा
![]()
साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त पूज्य सानेगुरुजी ग्रंथालयात अभिवादन
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे”च्या स्वरांत साने गुरुजींच्या विचारांना उजाळा
अमळनेर प्रतिनिधी : पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे थोर समाजप्रबोधक, साहित्यिक व मानवतावादी विचारवंत पूज्य साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन केले, तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी ग्रंथालयात विविध महापुरुषांच्या प्रतिमा सुबक व व्यवस्थितरित्या लावण्याच्या उपक्रमाबद्दल चिटणीस प्रकाश वाघ यांचे अभिनंदन केले. महापुरुषांच्या प्रतिमांमुळे त्यांच्या विचारांचा वारसा जिवंत राहतो आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास ग्रंथालयाचे संयुक्त चिटणीस सुमीत धाडकर, संचालक प्रसाद जोशी, पत्रकार ईश्वर महाजन यांच्यासह अनेक वाचक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वाचक दिलीप चव्हाण, रामकृष्ण शेलकर, भिका वाणी, प्रकाश चौधरी, सुरेश महाजन, नारायण जोशी, रघूनाथ घोटकर तसेच ग्रंथालय कर्मचारी मधुकर बाळापूरे व हरीश जाधव यांनीही साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी साने गुरुजींच्या अजरामर ओळी “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” सामूहिकरित्या गात त्यांच्या मानवतावादी, प्रेममय व समतावादी विचारांना उजाळा दिला. या प्रसंगी साने गुरुजींच्या कार्याचा स्मरणोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला.

