राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचा राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार-2026’ काशिनाथ माळी यांना प्रदान,  ३३ वर्षांच्या शैक्षणिक सेवेला राज्यस्तरीय गौरव; विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये घडवला यशाचा पाया
1 min read

राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचा राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार-2026’ काशिनाथ माळी यांना प्रदान, ३३ वर्षांच्या शैक्षणिक सेवेला राज्यस्तरीय गौरव; विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये घडवला यशाचा पाया

Loading

राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचा राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार-2026’ काशिनाथ माळी यांना प्रदान

३३ वर्षांच्या शैक्षणिक सेवेला राज्यस्तरीय गौरव; विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये घडवला यशाचा पाया

धुळे प्रतिनिधी
: राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2026’ साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री काशिनाथ नारायण माळी यांना प्रदान करण्यात आला.

पनवेल येथील व्ही. के. पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे पहिले वार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार व कोकण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाराम पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रविण स्वामी (उमरगा), माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, माजी सदस्य राज्य मागासवर्ग आयोग अॅड. बी. एल. सगर किल्लीरीकर तसेच संघाचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने उपस्थित होते.

श्री काशिनाथ माळी गेल्या ३३ वर्षांपासून विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. स्पर्धा परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे अनेक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच ते विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत.

यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना निसर्ग मित्र समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, देवगाव-देवळी संस्थेचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मुस्लिम स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र)चा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय कला गुणगौरव प्रतिष्ठान (औरंगाबाद)चा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच फुले-शाहू-आंबेडकर मिशन, औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार रामदादा भदाणे, भाजप जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, संस्थाध्यक्ष तुकाराम महाजन, सचिव एकनाथ महाजन, शिक्षक नेते संजय पवार, विज्ञान संघटनेचे पदाधिकारी, माळी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्री काशिनाथ माळी यांचे अभिनंदन केले आहे.

श्री माळी यांच्या या यशामुळे साक्री तालुका, धुळे जिल्हा आणि संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी आदर्श शिक्षक समाजासमोर उभा राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *