शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश; शिपाई कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी मंजुरी
1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश; शिपाई कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी मंजुरी

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश; शिपाई कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी मंजुरी

उल्हासनगर : शारदा विद्यामंदिर, उल्हासनगर येथे शिपाई पदावर कार्यरत असलेल्या रुपाली विष्णू वानखडे यांना दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कायमस्वरूपी वेतन पदाच्या मंजुरीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल वानखडे यांनी त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

रुपाली वानखडे यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून तात्पुरत्या नियुक्तीवर मंजूर झाला होता. मात्र कायमस्वरूपी वेतन पदावरील मंजुरी मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. या प्रकरणात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येत अखेर जिल्हा परिषदेकडून कायमस्वरूपी वेतन पदावर मंजुरी मिळाली.

या मंजुरीमुळे आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत रुपाली वानखडे यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक रोहित मुंडे, देविदास महाजन, तसेच शाळा व्यवस्थापन व संस्थेचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

याबाबत बोलताना रुपाली वानखडे म्हणाल्या, “ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी माझ्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मला कायमस्वरूपी मंजुरी मिळाली. हा आनंद माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारा आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन.”

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी म्हणून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना यानिमित्त व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *