अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती स्थापन; सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड
![]()
अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती स्थापन;
सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड
अमळनेर:-ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अमळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी नव्याने सनियंत्रण व व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अमळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य निलेश लक्ष्मण महाले पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता पुरुष प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख, रुग्णांना चांगल्या सुविधा, आरोग्य उपक्रमांना गती आणि स्थानिकांचा सहभाग वाढवणे हे समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
*समितीची रचना:*
अध्यक्ष:- राज्याचे माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील,
सदस्य:-पंचायत राज संस्थांचे 2 प्रशासक, एनजीओ प्रतिनिधी संजय कावडे, महिला सामाजिक कार्यकर्ता सौ. पूनम राहुल पवार, निलेश लक्ष्मण महाले पाटील ,पदसिद्ध सदस्य:- जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव, गट विकास अधिकारी अमळनेर, उप अभियंता बांधकाम विभाग, पशुसंवर्धन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी
सदस्य सचिव:- वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अमळगाव
निलेश महाले पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सहकार व जनहिताच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या लोकसंपर्काचा आणि अनुभवाचा लाभ रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा, स्वच्छता, औषध उपलब्धता, माता-बाल संगोपन, रोगप्रतिबंधक कार्यक्रम व विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी होणार आहे.निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, सौ. जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष चेतन राजपूत, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील,शेतकी संघ संचालक गणेश भामरे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
निलेश महाले पाटील यांच्या निवडीमुळे रुग्णालयाच्या सेवा अधिक परिणामकारक होतील आणि रुग्णांच्या प्रश्नांना सक्षम वाचा फोडली जाईल, अशी प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.

