मारवडचा निर्भय साळुंखे जेईईत अव्वल
![]()
मारवडचा निर्भय साळुंखे जेईईत अव्वल
कळमसरे ता. अमळनेर :- मारवड येथील निर्भय संदीप साळुंखे याने जेईई Advance परीक्षेत ९९.९८ गुण मिळवून संपूर्ण भारतात २०५४ रँक मिळवून अव्वल ठरला आहे.JEE मेन पेक्षा JEE Adavance परीक्षा कठीण असते.बारावीत असलेल्या निर्भय साळुंखे याने कठोर परिश्रमातून मोठे यश संपादन केले.त्यामुळे भारतातील सर्वात प्रतिष्टीत गणल्या जाणाऱ्या तीन आयआयटीत प्रवेशाचा त्याचा मार्ग सुकर झाला आहे. निर्भय हा आयकर आयुक्त संदीप रतन साळुंखे मारवडकर यांचा सुपुत्र आहे.त्यामुळे मारवड गावाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवाला गेला आहे.कळमसरे शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी व ज्येष्ठ पत्रकार जी. टी. टाक यांनी कळमसरे परिसरातर्फे निर्भय याचे अभिनंदन केले आहे.

