७ जुन रोजी जळगांव येथे ‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’व वर्ल्ड सायकल डे निमित्त सायकलिंग स्पर्धेचे आयोजन. जळगांव येथे रंगणार महिला सायकलपटूंचा थरार
![]()
७ जुन रोजी जळगांव येथे ‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग
लीग’व वर्ल्ड सायकल डे निमित्त सायकलिंग स्पर्धेचे आयोजन.
जळगांव येथे रंगणार महिला सायकलपटूंचा थरार
। प्रतिनिधी
जळगांव – जळगांव येथे जागतिक सायकल दिवस निमित्त विविध गटांमध्ये सायकलिंग स्पर्धा तसेचअस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग” जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन मेहरून तलाव चौपाटी जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित महिला सायकलपटू सहभागी होणार आहेत. ही लीग तीन गटांमध्ये होणार असून, त्यामध्ये वुमेन्स इलीट (खुला गट १९चे पुढे) आणि वुमेन्स जूनिअर (ज्युनिअर मुली१५ते१८, वयोगट) सब ज्युनिअर गट (वय १०ते १४गट) या तीन प्रकारात मुली च्या सायकल स्पर्धा होतील विजेत्या खेळाडूंना मेडल्स, सर्टिफिकेट व सहभागी सर्व खेळाडू ना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे तरी जिल्हातील जास्तीत जास्त मुलींनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य राज्य संघटनेचे सचिव प्रा. संजय साठे व जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप साखरे यांनी व सायकलिंग चे सर्व पदाधिकारी , तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांनी केले आहे.
महिलांना सायकलिंग खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित सायकलपटूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी संधी मिळवून देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांसाठी सायकलिंग स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंसह क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच हौसी पुरूषासाठी सायकल रॅलीचे, आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व सायकलिंग स्पर्धा मेहरून तलाव जळगाव येथे सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या आहे.या स्पर्धा केंद्र सरकार द्वारे खेलो इंडिया आणि सायकलिंग ऑफ इंडिया , सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, दि. सायकलिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आहे. या स्पर्धे साठी जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय जळगांव यांचे व पोलीस विभाग जळगाव, महानगरपालिका जळगाव, क्रीडा भारती जळगाव, यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.जास्तीत जास्त महीला खेळाडू नी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावे. किंवा स्पर्धा स्थळी आपले आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन उपस्थित राहावे आवश्यक त्या सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय सुविधा, नाष्टा जलपान व्यवस्थेपर्यंत सर्व बाबींचा काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक महिला व पुरुष सायकलपटू आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणार असून विजेत्यांना रोख बक्षीस, मेडल, प्रमाणपत्र मिळाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 7.00 वाजता होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. जिल्ह्यातील नागरिक, क्रीडा प्रेमींनी या स्पर्धे ला उपस्थित राहून महिला सायकलपटूंना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र चे सचिव प्रा. संजय साठे , सायकलिंग असोसिएशन जिल्हा सचिव डॉ . प्रदीप साखरे , माय भारत चे अभिषेक चावरे यांनी केले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी मीनल थोरात, सचिन निकम , कमलेश नगरकर, शेखर पोळ , डॉ. विलास नारखेडे, अनिल माकडे, प्रवीण पाटील, राजीव जाधव, शैलेंद्र बाविस्कर, डॉ. संजय निकम. बी एन पाटील, राजेंद्र कुलकर्णी, अशोक निकम, मेघा शाम शिंदे आदी प्रयत्न करत आहे.

