अमळनेरच्या वामन नगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण*
1 min read

अमळनेरच्या वामन नगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण*

Loading

*अमळनेरच्या वामन नगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण*

*अमळनेर:*
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विप्रो फॅक्टरी अमळनेर व आधार संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वामन नगर येथे मियावाकी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रकल्पांतर्गत शहराच्या पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी वामन नगर येथे 10 विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले.

. विप्रो केअरच्या वतीने *किशोर गुरव* सेफ्टी ऑफिसर, *दर्शन चौधरी* क्वालिटी ऑफिसर, *संदीप मोरे* अकाउंटंट ऑफिसर, *प्रशांत सैंदाने* परचेस ऑफिसर आणि *सुधीर बडगुजर* वेलफेअर ऑफिसर तसेच आधार संस्था प्रतिनिधी राकेश महाजन, अश्विनी भदाणे यांनी सहभाग घेतला.

वृक्षारोपणाद्वारे शहरातील हरितपट्टा वाढवून पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *