अमळनेर रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत कामांचा खासदार स्मिताताई वाघ व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी घेतला आढावा*
![]()
*अमळनेर रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत कामांचा खासदार स्मिताताई वाघ व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी घेतला आढावा*
अमळनेर प्रतिनिधी :
पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री रामशरय पांडे यांनी आज अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट देत ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी जळगावच्या खासदार स्मिता वाघ या देखील उपस्थित होत्या.तसेच
श्री पंकज सिंग डी आर एम,श्री आदिश पठानिया डी सी एम,श्री हिमांशू शर्मा अधिकाऱ्यांन समवेत स्थानक परिसराची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या कामांमध्ये काही आवश्यक दुरुस्त्या करण्याची मागणी केली. तसेच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थानक परिसरात आवश्यक नागरी सुविधा वाढविण्याबाबत सूचना केल्या.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या नरडाणा–धुळे रेल्वे मार्गाच्या कामाबाबतही खासदार वाघ यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. धुळे आणि जळगाव रेल्वेने थेट जोडले जावे यासाठी नरडाणा येथे रेल्वे बायपास तयार करण्यात यावा, याबाबत त्यांनी जनरल मॅनेजर यांच्याशी सविस्तर चर्चा करून पत्रव्यवहार केला. हा रेल्वे बायपास खानदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून भविष्यात मुंबई–पुणे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या या मार्गाने चालविणे शक्य होईल. त्यामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचे खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले.
यासोबतच अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी जनरल मॅनेजर यांच्याकडे केली. सध्या बंद असलेली पार्सल सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून व्यापारी व नागरिकांना मोठा फायदा होईल, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सैनानी, खा शी मंडळ संचालक निरज अग्रवाल, राकेश पाटील, दीपक भोई, शिवाजी राजपूत, राहुल चौधरी तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी नागरिक उपस्थित होते.

