जनगणना २०२७ मोहिमेत अमळनेर ग्रामीण चार्जची उल्लेखनीय कामगिरी, घरयादी व घरगणना काम सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल प्रगणक जितेंद्र गुरव व दत्तात्रय सोनवणे यांचा तहसील कार्यालयात सत्कार
1 min read

जनगणना २०२७ मोहिमेत अमळनेर ग्रामीण चार्जची उल्लेखनीय कामगिरी, घरयादी व घरगणना काम सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल प्रगणक जितेंद्र गुरव व दत्तात्रय सोनवणे यांचा तहसील कार्यालयात सत्कार

Loading

जनगणना २०२७ मोहिमेत अमळनेर ग्रामीण चार्जची उल्लेखनीय कामगिरी

घरयादी व घरगणना काम सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल प्रगणक जितेंद्र गुरव व दत्तात्रय सोनवणे यांचा तहसील कार्यालयात सत्कार

अमळनेर प्रतिनिधी :
भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील घरयादी व घरगणना अभियानात अमळनेर ग्रामीण चार्जने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या मोहिमेत नेमून दिलेल्या क्षेत्राचा अचूक नकाशा तयार करून डिजिटल पद्धतीने घरगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.

दि.१६ मे २०२६ पासून HLO App द्वारे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सुरू करण्यात आलेल्या जनगणना कामास अमळनेर ग्रामीण चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली वेग आला. या मोहिमेत शासकीय आश्रमशाळा पिंगळवाडे येथील उपशिक्षक जितेंद्र गुरव तसेच जिल्हा परिषद कन्याशाळा मारवड येथील मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी उत्कृष्ट नियोजन, अचूक माहिती संकलन व तत्पर कार्यपद्धतीच्या जोरावर घरयादी व घरगणनेचे काम सर्वप्रथम पूर्ण केले.

या उल्लेखनीय कार्याबद्दल तहसील कार्यालय, अमळनेर येथे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील व संजय गांधी नायब तहसीलदार आर. आर. ढोले यांच्या शुभहस्ते हा सत्कार संपन्न झाला.

यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी संगीता घोंगडे मॅडम, पर्यवेक्षक तथा इंजिनिअर सुभाष जाधव, एस. के. म्हस्के, तांत्रिक सहाय्यक विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे जनगणना मोहिमेचे काम वेगाने व अचूकपणे पूर्ण होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. तसेच सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक करून पुढील जनगणना प्रक्रियेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *