अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीत शासकीय ज्वारी, मका खरेदीचा शुभारंभ , आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
![]()
अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीत शासकीय ज्वारी, मका खरेदीचा शुभारंभ
आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
अमळनेर:- अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटी मार्फत शासकीय ज्वारी, मका व भरड धान्य खरेदीस उत्साहात शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
शुभारंभ प्रसंगी जानवे येथील शेतकरी स्वप्नील सुरेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्वारीची मोजणी करून खरेदी प्रक्रियेस औपचारिक सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन भागवत पाटील, संचालक पुरुषोत्तम पाटील, सुरेश पाटील, शामकांत पाटील, जयेशकुमार काटे, प्रफुल्ल पाटील, हिलाल सैंदाणे, ज्ञानेश्वर धनगर, सुनिल काटे, दिनकर पाटील, के.व्ही. पाटील, कामराज पाटील, मॅनेजर लहू पाटील व कर्मचारी वृंद तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना हमीभावाने बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.


