सामाजिक सद्भाव, विकास व मदतकार्याच्या मानवसेवेसाठी पत्रकारांनी पुढे यावे…गजानन नागे*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई- कोकण विभागाचा १३ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न…मार्गदर्शन व ओळखपत्र वितरण*
1 min read

सामाजिक सद्भाव, विकास व मदतकार्याच्या मानवसेवेसाठी पत्रकारांनी पुढे यावे…गजानन नागे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई- कोकण विभागाचा १३ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न…मार्गदर्शन व ओळखपत्र वितरण*

Loading

*सामाजिक सद्भाव, विकास व मदतकार्याच्या मानवसेवेसाठी पत्रकारांनी पुढे यावे…गजानन नागे*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई- कोकण विभागाचा १३ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न…मार्गदर्शन व ओळखपत्र वितरण*

*जुनी पदे बरखास्त करून नव्या नियुक्त्या आणि मुंबईत नवी २० जणांची टीम संघटनेत येत असल्याची लोकस्वातंत्र्य अध्यक्षांची माहिती.*

अकोला/मुंबई– देशात प्रचंड अराजकता पसरली असून सामाजिक सद्भाव लोप पावत आहे.अशा परिस्थितीत रंजल्या गांजलेल्यांना मुलभूत आणि आरोग्य सुविधेसोबत सामाजिक उपक्रमांसाठी ईतरांना प्रेरित करून सामाजिक सद्भाव वाढवणे गरजेचे आहे. मदत कार्यातून मानवतावादी कर्तव्यासाठी पत्रकरांनी पुढे येणे आवश्यक आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या संकेतानुसार अशा प्रकारचे कार्य लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघकरीत आहे.म्हणून मोलाचे कार्य करणारी ही संघटना सशक्त करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे असे आवाहन दादर येथील विदर्भ वैभव मंदिर ट्रस्टचे व बि.ई एस.टी कामगार संघटनेचे सरचिटणीस गजानन नागे यांनी केले.राजेंद्र आंगणे व कमलेश कुबल यांनी सर्वांच्या उपस्थितीत अध्यक्ष संजय देशमुख यांना झालेल्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करून त्यांच्या स्वास्थ आणि यशस्वी वाटचालीसाठी प्रेमपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई व कोकण विभागाचा १३ व्या मासिक विचारमंथन मेळावा विदर्भ वैभव मंदिर,दादर (प) मुंबई येथे संपन्न झाला.त्यावेळी ते अध्यक्षिय मनोगतातून बोलत होते. पुणे येथील विद्यापीठ हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व पत्रकार, विष्णू मोरे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. विष्णू मोरे यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यच्या सामाजिक सेवेचे आधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,अत्त्याचारग्रस्त महिला बळी, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,दिवंगत पत्रकार,रस्ते अपघात व आपत्तीग्रस्तांना यावेळी श्रध्दांजली अरवपन करण्यात आली.संघटनेवर महाराष्ट्राभरातून व्यक्त होणारे प्रेमभाव आणि वाटचालीबाबत शासन-प्रशानाकडील अभिप्रायांबाबत बोलतांना सर्वसमावेशक हिताची दुरदृष्टी ठेवत संघटनेप्रती निष्ठा आणि कर्तव्यभावनांनी संघटन मजुबत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढे यावे.तसेच मुंबई आणि महाराष्ट्रातील पूर्वीची पदे रद्द करून नवी पदरचना करणार असल्याची माहिती लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी दिली.पुष्पराज गावंडे व विष्णू मोरे (पूणे) यांनी आवाहन आणि मार्गदर्शन‌ केले.

हसत बोलत अत्यंत खेळीमेळीच्या झालेल्या कार्यक्रमास कमलेश कुबल,राजेंद्र आंगणे,सतिश अडावडे,सुहास मोरे,मंगल शिंदे,प्रभाकर तळोकार,व ईतर सभासदांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे संचलन, प्रास्ताविक,आणि आभारप्रदर्शन संज एम.देशमुख यांनी केले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *