वैदर्भीय बोलीच्या अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोलेंना कार्यशाळेत निमंत्रण.
1 min read

वैदर्भीय बोलीच्या अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोलेंना कार्यशाळेत निमंत्रण.

Loading

वैदर्भीय बोलीच्या अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोलेंना कार्यशाळेत निमंत्रण.

अकोला– महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था,मराठी भाषा विद्यापीठ या पाच शासकीय संस्थांतर्फे नाशिक येथे नुकतीच बोली अभ्यासक कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत वर्‍हाडी बोलीचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोले यांना निमंत्रित करण्यात आले होते.तिथे त्यांनी बोली ही स्त्रियांची मिरासदारी असून बोली टिकवण्यात आणि वाढवण्यात स्त्रियांचे मोठे योगदान आहे.तरीही बोलीतही त्यांना दुय्यम दर्जा देण्यात येत आहे,अशी खंत व्यक्त केली.बोलीत समर्पक ज्ञान असूनदेखील त्याचा व स्त्रियांचा अधिक्षेप करण्यात आला.दबाव संस्कृतीमुळे स्त्रियां मोकळ्या बोलत नाहीत, पण आपण स्त्रियांच्या म्हणी, आईच्या म्हणी म्हणून गोळा केल्या आहेत.तसेच पारंपरिक स्त्रीगाथा म्हणून गाणी गोळा केली आहेत हे आवर्जून सांगितले.या कार्यशाळेत महाराष्ट्रातील बहुतांशी भाषा अभ्यासक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *