जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात नवीन अधिकाऱ्यांचे स्वागत उत्साहात ,माध्यमिक वेतन पथक अधीक्षकपदी दिलीप पवार, उपशिक्षणाधिकारी म्हणून चंद्रकांत गवळी यांनी स्वीकारला पदभार
![]()
माध्यमिक शिक्षण विभागाला नूतन उपशिक्षणाधिकारी व वेतन पथक अधिक्षक यांनी पदभार स्वीकारला.
जळगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, जळगाव येथे वेतन पथक अधीक्षक म्हणून श्री. दिलीप पवार उपशिक्षणाधिकारी, चंद्रकांत गवळी यांनी आज पदभार स्वीकारला
यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिलीप पवार, चंद्रकांत गवळी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
या प्रसंगी समन्वय समितीचे डॉ. मिलिंद बागुल, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष (प्राथमिक) नरूभाऊ सपकाळे, (माध्यमिक) जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण,माध्यमिक पतपेढीचे उपाध्यक्ष तुषार बोरसे,महेंद्र पवार, संतोष कचरे, समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, स्वप्निल पाटील तसेच ज्युनिअर कॉलेज संघटनेचे सुनील गरुड,शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष नारायण वाघ,संदीप डोलारे,आत्माराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
चौकट
माध्यमिक वेतन पथक अधिक्षक दिलीप पवार यांचे स्वागत करतांना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण सोबत उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी,तुळशीराम सोनवणे,संतोष कचरे,डॉ.मिलिंद बागुल,महेंद्र पवार, नरेंद्र सपकाळे

