लोकस्वातंत्र्य पत्रकार संजय देशमुख यांचा परभणीत भव्य नागरी सत्कार !* *जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या “महाराष्ट्र आयकॉन” पुरस्कार व कलाकार, विद्यार्थी सन्मान समारंभात उद्घाटक सत्कार मुर्ती म्हणून उपस्थिती*
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार संजय देशमुख यांचा परभणीत भव्य नागरी सत्कार !*
*जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या “महाराष्ट्र आयकॉन” पुरस्कार व कलाकार, विद्यार्थी सन्मान समारंभात उद्घाटक सत्कार मुर्ती म्हणून उपस्थिती*
*अकोला* – पत्रकार आणि समाजाच्या न्याय हक्क आणि कल्याणाच्या संघर्षक वाटचालीने संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख (निंबेकर) यांचा परभणी येथे नुकताच भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यांचे सोबत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित परभणीचे नवनिर्वाचित युवा महापौर सय्यद इकबाल यांचाही यावेळी सत्कारमूर्ती म्हणून समावेश होता.परभणीचे समाजशील युवा पत्रकार महेमुद खान यांच्या जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने “महाराष्ट्र आयकॉन” पुरस्कार,कलावंतांचा आणि १० वी व १२ वी घ्या विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.माजी राज्यमंत्री फौजिया खान यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
परभणीतील ही संस्था लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कार्याबध्दल नेहमीच गौरवास्पद प्रतिक्रिया व्यक्त करीत असून अध्यक्ष महेमुदभाई आणि सहकाऱ्यांनी ऑगस्ट महिण्यातील “तिरंगा मेरी जान” या राष्ट्रभक्तीपर गितगायनाच्या कार्यक्रमात सुध्दा अध्यक्ष संजय देशमुख यांना पुरस्कारार्थी तथा विशेष प्रमुख अतिथी म्हणून व यावेळी उद्घाटक व सत्कारमुर्ती म्हणून निमंत्रित केले होते.याप्रसंगी त्यांचेसोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी,कादंबरीकार पुष्पराज गावंडे,ज्येष्ठ पत्रकार,पदाधिकारी अंबादास तल्हार,प्रा.विजय काटे, अकोला जिल्हा सचिव मनोहर मोहोड, यांची प्रमुख उपस्थितीमध्ये समावेश होता.
बसमत रोडवरील श्री शिवाजी विधी महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र निर्माण रत्न,प्रबोधनकार आर.डी.मगर,तर अलि मदत केंद्राचे अध्यक्ष, कॉन्ट्रॅक्टर, समाजसेवक सैय्यद गौस हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते.क्राईम ईन्व्हेस्टीगेशन ब्युरो संचालिका फराह नाज अंजूम,पोलिस उपनिरीक्षक वल्लभ धोत्रे,मोहम्मद फारूख कादरी,रफत खान, नगरसेवक बशीर अहमद,शेख शरीफ,शाहेद सिद्दीकी या समाजसेवींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम महापुरूषांना वंदन,अभिवादन करण्यात येऊन २५ जणांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आले.सोबतच अग्रेसर कलावंत व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अनेक वर्षापासून विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणारे जनसहयोग संस्थेचे अध्यक्ष प्रिय महेमुद खान,शेख सरफराज,तथा मोईन खान व सहकाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या सामाजिक वाटचालीला शुभेच्छा व्यक्त केल्या
या दौऱ्यामध्ये अध्यक्ष संजय देशमुख यांचेसोबत परभणीमधून महाराष्ट्र संघटन प्रमुख भगिरथजी बद्दर,विभागीय संघटक वाजेद खान पठाण,देवानंद वाकळे,कलिम कुरेशी,दिलीप बनकर,प्रमोद अंभोरे,दिलीप बोरूड,नुरूद्दीन जावेद सिद्दीकी,अब्दुल कलिम,युनुसभाई व अनेक पदाधिकारी व सभासद सोबत उपस्थित होते.वाजेद खान पठाण यांचा नेहमीप्रमाणे विशेष सहयोग व शेवटपर्यंत उपस्थिती होती.कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रविण वायकोस यांनी केले.

