परभणी पत्रकार विजय मुंदडा यांच्या अपघाती निधनाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने व्यक्त केला शोक* , *आरोपींना तात्काळ अटक करण्याची संजयजी देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी*
![]()
*परभणी पत्रकार विजय मुंदडा यांच्या अपघाती निधनाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने व्यक्त केला शोक*
*आरोपींना तात्काळ अटक करण्याची संजयजी देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी*
*अकोला/परभणी:* परभणी-बसमत रस्ता ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात विजय मुंदडा यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी मुंदडा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विजय मुंदडा हे रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली होती. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेची माहिती मिळताच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी मुंदडा यांच्या घरी जाऊन त्यांचे सुपुत्र आणि परिवाराची भेट घेतली व आपली शोकसंवेदना व्यक्त केली.
यावेळी संजयजी देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मुंदडा यांना धडक देऊन पसार झालेल्या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना ‘अर्जंट’ अटक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा प्रवृत्तींना कायद्याचा धाक बसणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी भगीरथजी बद्दर,पुष्पराज गांवडे,जेष्ट पत्रकार अंबादास तल्हार,प्राध्यापक विजय काटे,दिलीप बुरुड, मनोहर मोहोड,देवानंद वाकळे,वाजेद खान यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही विजय मुंदडा यांना श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त केला. या घटनेमुळे मुंदडा परिवारावर कोसळलेल्या दुःखात पत्रकार महासंघ पूर्णपणे सोबत असल्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

