अमळनेर येथे उद्या शिवसेनेची SIR आढावा बैठक व भव्य सत्कार सोहळा इंदिरा गांधी भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा; प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार
![]()
अमळनेर येथे उद्या शिवसेनेची SIR आढावा बैठक व भव्य सत्कार सोहळा
इंदिरा गांधी भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा; प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार
अमळनेर : शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब व जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख आ. दिलीप मामा लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे उद्या शिवसेनेच्या वतीने SIR आढावा बैठक व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. आ. शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमास आ. अमोलदादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, जिल्हाप्रमुख वासुदेवजी पाटील, विष्णुभाऊ भंगाळे, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सरिताताई माळी, ॲड. ललिता ताई पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर तसेच जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार दि. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे संपन्न होणार आहे.
तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सरपंच, सदस्य, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी केले आहे.


