मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट*
![]()
*मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट*
*मुंबई, दि. २० मे : मुंबई युनिव्हर्सिटीने प्रथम वर्षाचे महाविद्यालयीन ऑनलाइन प्रवेश 25 ऑगस्ट 2025 पासून बंद केले , मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या मुंबई,ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 3000 विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयांनी ऑफलाइन प्रवेश दिले होते, मात्र मुंबई युनिव्हर्सिटीने ऑनलाइन प्रवेश मुदतवाढ दिली नाही, उलट उशिरा प्रवेश दिले म्हणून विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयाला पाच ते दहा लाखाचा दंड ठोठावला, विद्यार्थ्यांचे भवितव्य व शैक्षणिक नुकसान यामुळे होताना दिसत होते, म्हणून आज कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी महाराष्ट्राचे राज्याचे महा माहीम राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांच्या भवितव्यास अडचण येऊ नये म्हणून सदर 3000 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करून द्यावी, तसेच महाविद्यालयांवरील लावलेला दंड माफ करावा अशी विनंती केली.*
*राज्यपाल महोदयांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कुलगुरूंशी चर्चा करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्या साठी तसेच महाविद्यालयांवरील दंड माफ करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले.*
*या बैठकीस मा. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.), सह सचिव श्री. एस. राममूर्ती (भा.प्र.से.), परिसहायक लेफ्टिनेंट विक्रम कुमार (भा.नौ.), खाजगी सचिव श्रीमती अर्चना प्रसाद गायकवाड तसेच अतिरिक्त खाजगी सचिव श्री. पवन सिंग उपस्थित होते.*
*सोबत जवाहर वसायणी सर व प्राचार्य अमोल कदम सर उपस्थित होते.या साठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सत्यताने पाठपुरावा केला होता, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब व सर्व अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या , शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सदर बैठकीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल*

