20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ  योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम
1 min read

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ  योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम

Loading

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ

योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम

अमळनेर शहरातील साने गुरुजी पतसंस्था, क्रांती नगर येथे योग विद्या गुरुकुल, नाशिक यांच्या वतीने “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” या प्रेरणादायी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20 मे ते 29 मे 2026 दरम्यान दररोज सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत हे दहा दिवसीय शिबिर पार पडणार आहे.

सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सुवर्णसंधी” या संकल्पनेवर आधारित या शिबिरामध्ये मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. योगाभ्यास, प्राणायाम, ध्यान साधना, बौद्धिक व शारीरिक खेळ, स्वावलंबन, नेतृत्व गुण विकास तसेच सकारात्मक विचारांची जोपासना अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

शिबिरासाठी पुणे येथील योग शिक्षक तथा हेल्थ कोच सचिन डोंगरे यांचे प्रेरणादायी ऑनलाईन मार्गदर्शन लाभणार असून, मुलांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, मानसिक स्थैर्य आणि संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी वयोगट 7 ते 14 वर्षे निश्चित करण्यात आला असून, प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. शिबिर शुल्क फक्त 250 रुपये ठेवण्यात आले असून त्यामध्ये भोजन, टिफीन आणि आहार-विहार मार्गदर्शनाचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी योग शिक्षिका ज्योती पाटील (8551951167), निलमिसा पाटील (9423367111), लीना पाटील (9422292222) व मनीषा पाटील (9423976144) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“संस्कार, साधना आणि स्वावलंबनाकडे एक प्रेरणादायी पाऊल…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *