टिईटी चा विषय आता दिल्ली दरबारी अनिल बोरनारे यांनी घेतली खासदार विनोद तावडे यांची भेट देशातील एक कोटी शिक्षकांना टीईटीतून वगळण्याची केली मागणी
![]()
टिईटी चा विषय आता दिल्ली दरबारी
अनिल बोरनारे यांनी घेतली खासदार विनोद तावडे यांची भेट
देशातील एक कोटी शिक्षकांना टीईटीतून वगळण्याची केली मागणी
मुंबई (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिक्षकांसमोर टीईटी देण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शिक्षकांना या टीईटीला सामोरे जावे लागणार आहे
देशातील सुमारे एक कोटी शिक्षकांना या टीईटीतून वगळण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची चर्चा करावी अशी मागणी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा सदस्य विनोद तावडे यांच्याकडे केली आहे
ठाणे येथील एका कार्यक्रमात अनिल बोरनारे यांनी विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा व देशभरातील शिक्षकांना दिलासा द्यावा अशा प्रकारचे निवेदन देऊन ही मागणी केली
देशात 14 लाख 72 हजार शाळा असून या शाळांमध्ये एक कोटीहून अधिक शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहे या सर्वच शिक्षकांसमोर टीईटी यामुळे चिंतेचे वातावरण असून दैनंदिन अध्यापन करून टिईटी कसे उत्तीर्ण व्हावे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे
वास्तविक पाहता देशात राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2010 मध्ये लागू झाला अनेक राज्यांमध्ये त्यानंतर राईट टू एज्युकेशन ॲक्टची अंमलबजावणी करण्यात आली.
ज्या राज्यांमध्ये हा कायदा ज्या वर्षी संमत झाला त्यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना यातून वगळण्यात यावे तसेच टी ई टी मुळे थांबवलेल्या पदोन्नती वेतनश्रेणी सुरू करण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे अनिल बोरनारे यांनी केली आहे

