अमळनेर येथे श्वान, कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी जागरण कार्यक्रम,  मुंबई येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा सहभाग
1 min read

अमळनेर येथे श्वान, कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी जागरण कार्यक्रम, मुंबई येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा सहभाग

Loading

अमळनेर येथे श्वान, कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी जागरण कार्यक्रम,

मुंबई येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा सहभाग

अमळनेर प्रतिनिधी

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मुंबई, रोटरी क्लब ऑफ अमळनेर, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक विद्यमाने श्वान/ कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी रोटरी हॉल अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लब प्रेसिडेंट देवेंद्र कोठारी, आशिष चौधरी, प्रतीक जैन, डॉ राजेंद्र धनगर, समाजकार्य महाविद्यालय प्रा विजयकुमार वाघमारे, आधार संस्था संचालक रेणू प्रसाद यांची उपस्थिती होती. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी चेअरमन अभिजीत भांडारकर , आधार संस्था अध्यक्ष डॉ भारती पाटील यांनी सहकार्य केले.

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मुंबई चे कार्यक्रम अधिकारी विवेक गोस्वामी यांनी प्रास्ताविक केले. कुत्रा चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी आणि श्वान लसीकरण साठी लोकांना आवश्यक माहिती देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

पशु वैद्यक डॉ राजेंद्र धनगर यांनी कुत्रा, श्वान हा शेतकरी मित्र आहे, पाळीव प्राणी आहे. कुत्रा चावला तर रेबीज हा आजार होतो. या आजारावर उपचार मर्यादित आहेत.

पथनाट्य
समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथील स्वयंसेवक सागर कोळी, किर्ती सोनवणे, यामिनी माळी, अनुजा पाटील, सचिन सावळे, शिरूडकर
प्रद्न्या, आकाश सैदाने, मोहिनी पाटील यांनी पथनाट्य सादर यासह विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्र संचलन दिपक संदानशीव यांनी केले. आभार विवेक गोस्वामी यांनी व्यक्त केले.

यशस्वितेसाठी संजय कापडे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन,समाधान धनगर, मोहिनी धनगर, अश्विनी भदाणे , योगिता पाटील, ऊर्जिता शिसोदे, भावेश मराठे , माया जाधव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *