शिक्षण माफियांचा घाणेरडा खेळ उघडकीस! NEET पेपरफुटीविरोधात अमळनेर PTA चा एल्गार
1 min read

शिक्षण माफियांचा घाणेरडा खेळ उघडकीस! NEET पेपरफुटीविरोधात अमळनेर PTA चा एल्गार

Loading

पैशासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य विकणाऱ्यांना फाशी द्या!
NEET घोटाळ्याविरोधात अमळनेरमध्ये तीव्र आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी

देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या गंभीर प्रकाराविरोधात अमळनेरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि प्रामाणिकपणाशी खेळ करणाऱ्या या शिक्षण माफियांविरोधात अमळनेर PTA तसेच विविध शैक्षणिक संस्था प्रमुखांच्या वतीने सोमवार, दि. १८ मे रोजी प्रांत कार्यालय परिसरात शांततामय पण तीव्र आंदोलन करण्यात आले.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही”, “पेपरफुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी अमळनेरचे प्रांताधिकारी मा. श्री. मयूर भंगाळे यांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर PTA चे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब मगर सर यांनी केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यकर्ते तथा साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. संदीप घोरपडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीची होणारी पायमल्ली ही अत्यंत वेदनादायक असल्याचे सांगत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट प्रवृत्तींचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. “रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पैशासाठी गदा आणणाऱ्यांना माफी नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
PTA तर्फे सौ. सुरश्री वैद्य मॅडम तसेच श्री. सुधीर टाकणे सर यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेची गरज अधोरेखित केली. NEET अन्यायग्रस्त विद्यार्थी लावण्या सातपुते व अजिंक्य पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, नैराश्य आणि अन्याय याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
या आंदोलनात आयकेडी अकॅडमीचे संचालक
श्री. किरण माळी सर, श्री. राकेश बडगुजर सर, सौ. सुरश्री वैद्य मॅडम, श्री. ज्ञानेश्वर मराठे सर, श्री. नागराज माळी सर, श्री. हर्षल बडगुजर सर, श्री. स्वर्णदीप राजपूत सर, श्री. संदीप महाजन सर, श्री. सुधीर टाकणे सर, श्री. ज्ञानेश्वर साळुंखे सर, श्री. अविनाश कोळी सर, श्री. सुनील पाटील सर आदी PTA क्लास संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मेहनतीच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या; शिक्षण माफियांना जेलमध्ये टाका!”
अशी एकमुखी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *