नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार,  ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती
1 min read

नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार, ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती

Loading

नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार

४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी) :
अमळनेर येथील विश्ववंदनीय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठित बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी भगवान श्री नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्तीचा स्थापना समारंभ अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे. या पवित्र सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भगवान स्वामीनारायण यांचे बालपणीचे नाव ‘घनश्याम’ होते. अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी गृहत्याग करून संपूर्ण भारतभर कठोर तपश्चर्या, तीर्थाटन आणि धर्मप्रसारासाठी वनविचरण केले. या दिव्य प्रवासात त्यांना ‘नीलकंठ वर्णी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी तब्बल १२ हजार किलोमीटरची पदयात्रा सात वर्षे, एक महिना आणि अकरा दिवसांत पूर्ण करून भारतीय अध्यात्माच्या इतिहासात एक अद्वितीय आदर्श निर्माण केला.

परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या कृपा व आशीर्वादाने होत असलेल्या या स्थापना समारंभात सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत महापूजा, त्यानंतर सायंकाळी ६.१५ ते ७.३० या वेळेत कथा व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या मंगल सोहळ्यास संपूर्ण खानदेशाचे कोठारी संत पूज्य आनंदजीवन स्वामीजी तसेच बीएपीएस संस्थेचे विख्यात कथाकार संत पूज्य जनमंगल स्वामीजी यांची पावन उपस्थिती लाभणार असून त्यांच्या दिव्य वाणीचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून श्री नीलकंठ वर्णी महाराजांचे दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर मंदिराचे पूज्य योगीस्नेह स्वामी व पूज्य अखंडमुनी स्वामी यांनी सर्व भाविक भक्तांना केले आहे. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनुपम संगम ठरणारा हा सोहळा अमळनेरच्या धार्मिक वैभवात आणखी एक सुवर्ण अध्याय ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *