अमळनेरात आज “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”, संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या वतीने होणार सादरीकरण
![]()
अमळनेरात आज “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”
संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या वतीने होणार सादरीकरण
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरात आज 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”चे आयोजन करण्यात आले असुन संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने या महानाट्यचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे.
सामाजिक जाणिव आणि विविध क्षेत्रात असलेल्या उणिवा पूर्ण करण्यासाठी अमळनेरात जयनिल फाऊंडेशनचा आज शुभारंभ होणार असून आज १४ मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित् संस्थेच्या कार्याचा प्रारंभ होणार असल्याची माहिती युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील व वरुण राजेश पाटील यांनी दिली.
तर संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने नाट्य कलाकार निकेश राजपुत यांनी माहिती देताना सांगितले की या महानाट्यात सुमारे 250 कलाकार असून संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदानाची गाथा या महानाट्यातून सादर होणार आहे. संस्कृती फाऊंडेशन तसेच सात्विक ठकार लिखित व राकेश राजपूत दिग्दर्शित या महानाटकात उत्तर महाराष्ट्रातील कलाकार असून जवळपास 80 टक्के पेक्षा अधिक कलाकार अमळनेर येथील आहेत.सुमारे अडीचशे च्या वर कलाकार यात असणार आहेत.ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही अथवा परिस्थितीमुळे मिळू शकले नाही त्यांना संधी देण्याचा प्रयत्न संस्कृती फाऊंडेशनने केला आहे.या महानाट्यचे अमळनेरच्या पूर्वी नंदुरबार, धुळे आदी ठिकाणी तीन यशस्वी प्रयोग झाले असून अमळनेरात चवथा आणि पाचवा प्रयोग होणार आहे.
यासाठी गेल्या महिन्याभरापासून स्थानिक कलाकारांना प्रशिक्षण दिले जात गेले आहे. सिनेमा एक आर्टिफिशियल स्ट्रक्चर असतो परंतु महानाट्य ही एक वेगळी संकल्पना असल्याने लाईव्ह इतिहास प्रेक्षकां समोर सादर होणार आहे.आमदार अनिल पाटील व जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व वरून राजेश पाटील यांनी विशेष असे योगदान दिल्याने आम्हाला बळकटी मिळून जास्तीजास्त तरुणाईला हे महानाट्य आज दाखविले जाणार असल्याचे निकेश राजपूत यांनी सांगितले.सकाळी 10 वाजता पहिला व सायंकाळी 6 वाजता दुसरा असे दोन प्रयोग या महानाट्यचे होणार आहेत.
सकाळी 10 वाजता तरूणाईसाठी स्वतंत्र प्रयोग
जयनिल फाऊंडेशनचे गौतम पाटील यांनी सांगितले की छत्रपती संभाजी राजे हे तरुणाईचे आदर्श असल्याने खास महाविद्यालयीन युवक आणि युवतींसाठी जयनिल फाऊंडेशनच्या वतीने आज 14 मे रोजी सकाळी 10 वाजता स्वतंत्र प्रयोग होणार असुन सर्व युवक युवतींनी जरूर उपस्थिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

