धरणगावच्या लेकीचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न ! , सत्यशोधक विवाह लावून सोनवणे परिवाराने केली क्रांतीची सुरुवात : डॉ. सुरेश झाल्टे
1 min read

धरणगावच्या लेकीचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न ! , सत्यशोधक विवाह लावून सोनवणे परिवाराने केली क्रांतीची सुरुवात : डॉ. सुरेश झाल्टे

Loading

धरणगावच्या लेकीचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न !

सत्यशोधक विवाह लावून सोनवणे परिवाराने केली क्रांतीची सुरुवात : डॉ. सुरेश झाल्टे

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – धरणगाव मोठा माळी वाडा येथील बाजीराव अंबादास महाजन यांची सुकन्या सत्यशोधिका नीलिमा आणि कै.विनायक सदाशिव माळी यांचे ज्येष्ठ चिरंजीव व दिनकर सदाशिव माळी यांचे पुतणे सत्यशोधक खुशाल यांचा बोरसे हायस्कूल , कामगार नगर , कापडणे जि.धुळे या ठिकाणी माळी समाजाचा “आदर्श विवाह ” सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला.
या सत्यशोधक विवाहप्रसंगी समस्त थोर संत, महामानव, महामातांच्या प्रतिमापूजन वधू-वरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांनी उपस्थित नातलक ,आप्तेष्ट, मित्रपरिवार यांना सत्यशोधक समाजाचे महत्त्व, काळाची गरज आणि अंधश्रद्धा कर्मकांड पासून दूर राहण्याचा संदेश दिला. आपली मूळ संस्कृती ही कृषी संस्कृती आहे या संदर्भात विस्तृत असे विश्लेषण केले. सत्यशोधक विवाह लावून सोनवणे परिवाराने क्रांतीची सुरुवात केली असे प्रतिपादन डॉ. झाल्टे यांनी केले.
सत्यशोधक विवाहप्रसंगी वर – वधूंनी सत्यशोधक समाजाची शपथ घेतली. विवाहप्रसंगी पारंपारिक पद्धतीने अक्षदा न टाकता फुलांची पाकळ्यांची उधळण करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनी रचलेले मंगलाष्टकांचे गायन सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन ( एरंडोल ) व भगवान रोकडे (चाळीसगाव ) यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ. सुरेश झाल्टे, सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन, भगवान महाजन, नितीन महाजन व मान्यवर यांच्या उपस्थितीत सत्यशोधक विवाह प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सत्यशोधक विवाहाची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार (छत्रपती संभाजीनगर ), राज्यप्रभारी विधीकर्ते राजकिशोर तायडे ( धुळे ), जळगांव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील ( धरणगांव ) ,धुळे जिल्हाध्यक्ष अनिल बोरसे यांचेकडून मिळाली. कापडणे परिसरात या सत्यशोधक विवाहचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पदाधिकारी मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *