अमळनेरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन  उदया, अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातून भगवा चौकात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन
1 min read

अमळनेरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उदया, अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातून भगवा चौकात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन

Loading

अमळनेरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन आज

अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातून भगवा चौकात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अद्वितीय पराक्रम, धर्मनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या स्वराज्यरक्षक छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी अमळनेर शहरात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात येत आहे.

‘अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठान’ यांच्या संयोजनाने दि. 14 मे 2026, गुरुवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता भगवा चौक, अमळनेर येथे भव्य स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी, स्वराज्यनिष्ठ नागरिक आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

*स्वराज्याच्या इतिहासाला अभिवादन*

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, विद्वत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रेरणादायी प्रतीक मानले जाते. त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास, त्याग आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

भगवा चौक परिसरात उभारले जाणारे हे स्मारक भविष्यात शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

*स्वराज्य प्रेमींना उपस्थितीचे आवाहन*

या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रक प्रशांत भाऊ निकम (उपनगराध्यक्ष, नगर परिषद अमळनेर) तसेच समस्त भगवा चौक मित्र परिवार आहेत.

“स्वराज्याच्या इतिहासाला अभिमानाने सलाम करण्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या शुभारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व स्वराज्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *