जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज
1 min read

जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज

Loading

जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या !

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज

मुंबई / पुणे प्रतिनिधी :
राज्यात जनगणना तसेच BLO (Booth Level Officer) ड्युटीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता देण्यात यावा, अशी ठाम मागणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज पुणे येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन सादर केले असून, दोन्ही संचालकांशी प्रत्यक्ष चर्चा करून विषयाची गंभीरता मांडली.

राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सध्या जनगणना आणि BLO ड्युटी पार पाडत आहेत. या कामासाठी त्यांना गावोगावी, मतदान केंद्रांवर तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नियमित शालेय कामकाजासोबतच अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळताना आर्थिक भारही वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी स्पष्टपणे सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार निवडणूक व जनगणना कामे प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये. ड्युटी करत असताना प्रवास अपरिहार्य असल्याने त्यांना मे 2026 महिन्याचा पूर्ण प्रवास भत्ता देणे ही शासनाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी आहे.

या संदर्भात त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांशी सकारात्मक चर्चा केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडूनही आमदार म्हात्रे यांच्या या भूमिकेचे स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रश्न प्रभावीपणे मांडला गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *