१४ मे रोजी अमळनेरात रंगणार “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे” महानाट्याचा ऐतिहासिक सोहळा !  “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे” महानाट्याच्या माध्यमातून शंभूराजांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा अनुभवण्याची सुवर्णसंधी
1 min read

१४ मे रोजी अमळनेरात रंगणार “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे” महानाट्याचा ऐतिहासिक सोहळा ! “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे” महानाट्याच्या माध्यमातून शंभूराजांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा अनुभवण्याची सुवर्णसंधी

Loading

 

१४ मे रोजी अमळनेरात रंगणार “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे” महानाट्याचा ऐतिहासिक सोहळा !

“स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे” महानाट्याच्या माध्यमातून शंभूराजांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा अनुभवण्याची सुवर्णसंधी

अमळनेर प्रतिनिधी :
स्वराज्याचे धाकले धनी, धर्मरक्षणासाठी आयुष्य वेचणारे आणि भारतभूमीच्या शौर्यपरंपरेचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शंभूराजे यांच्या अद्वितीय पराक्रम, त्याग आणि बलिदानाची ज्वलंत गाथा आता अमळनेरकरांना अनुभवता येणार आहे. संस्कृती फाउंडेशन, अमळनेर आयोजित आणि अरुद्र इव्हेंटस् निर्मित “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे” हे भव्य महानाट्य गुरुवार, दि. १४ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे रंगणार आहे.
शंभूराजांच्या जीवनातील संघर्ष, औरंगजेबाच्या क्रौर्याविरुद्धचा निर्धार, हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि रणांगणातील धगधगता इतिहास या महानाट्यातून प्रभावी पद्धतीने उलगडला जाणार आहे. दमदार संवाद, थरारक युद्धदृश्ये, भव्य नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीताच्या माध्यमातून उपस्थितांना इतिहास प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिल्याचा अनुभव मिळणार आहे.
या महानाट्यासाठी अमळनेर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमास विशेष आकर्षण लाभले आहे. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. डिगंबर विठ्ठलराव महाले (नगरसेवक, अमळनेर नगरपरिषद तथा सरचिटणीस, व्हॉईस ऑफ मिडिया), सरजूसेठ गोकलाणी (कलागुरु बिझनेस ग्रुप, अमळनेर), अतुलभाऊ प्रवीणचंद्र सोनी (ए.पी. ज्वेलर्स, स्वामीनारायण मंदिर, अमळनेर), विजयभाऊ पाटील (स्वादिष्ट नमकीन, अमळनेर), सौरभ भिकमचंद जैन (सीवान टेन्ट हाऊस, अमळनेर), डॉ. संदीप जोशी (अध्यक्ष, लायन्स क्लब, अमळनेर व नर्मदा मेडिकल फाउंडेशन), सुरेंद्रभाऊ केशवलाल बोहरा (माजी नगराध्यक्ष, पारोळा तथा चेअरमन – सायरादेवी बोहरा मोटूल स्कूल, मंगरूळ-अमळनेर आणि बोहरा सेंट्रल स्कूल, पारोळा), प्रतीक कैलाशचंद्र जैन (रिषभ फर्निचर, अमळनेर), डॉ. स्वप्ना नितीन पाटील (आदित्य हॉस्पिटल, अमळनेर) तसेच रामदेवबाबा, कळमसरे-अमळनेर यांचा समावेश आहे.

संस्कृती फाउंडेशनच्या वतीने शहरातील सर्व शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि युवकांना या महानाट्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“राजांची तळपती तलवार पाहायला या… शब्दांची धार आणि नजरेतील अंगार अनुभवायला या… स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शंभूराजांचा जाज्वल्य इतिहास जगायला या…” अशा भावनिक शब्दांत आयोजकांनी नागरिकांना निमंत्रण दिले आहे.
या ऐतिहासिक सांस्कृतिक सोहळ्याचे निमंत्रक म्हणून संस्कृती फाउंडेशन, अमळनेर व नयना कुलकर्णी मॅडम विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *