दोन महिन्यांचे रखडलेले वेतन अखेर मार्गी लागणार; शिक्षणाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका”  “माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी समन्वय समिती आक्रमक; पुढील दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन” शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या फोनद्वारे वेतनासदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना
1 min read

दोन महिन्यांचे रखडलेले वेतन अखेर मार्गी लागणार; शिक्षणाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका” “माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी समन्वय समिती आक्रमक; पुढील दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन” शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या फोनद्वारे वेतनासदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

Loading

“दोन महिन्यांचे रखडलेले वेतन अखेर मार्गी लागणार; शिक्षणाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका”

“माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी समन्वय समिती आक्रमक; पुढील दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन”
शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या फोनद्वारे वेतनासदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

“जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये करण्यास शिक्षण विभागाची मान्यता”
पगार बिल वेळेवर न पाठवल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई

जळगाव  प्रतिनिधी: जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मार्च व एप्रिल २०२६ चे प्रलंबित वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, या मागणीसाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मा.कल्पना चव्हाण मॅडम शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात शालार्थ प्रकरणामुळे मागील दोन महिन्यांपासून अनेक शिक्षकांचे वेतन रखडल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. मा. उच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकांचे वेतन पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शिक्षकांवर विमा, पतसंस्था व बँक कर्जाचे हप्ते तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असल्याने वेतन रखडल्यामुळे गंभीर आर्थिक व मानसिक अडचणी निर्माण झाल्याचे समितीने नमूद केले.

यावेळी मा.कल्पना चव्हाण मॅडम यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ वेतन अधीक्षकांशी संपर्क साधून चर्चा केली. पुढील दोन दिवसांत सर्व त्रुटींची पूर्तता करून वेतन देयकाचा मार्ग मोकळा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांचे वेतन तत्काळ करण्यासंदर्भात फोनद्वारे शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांना सूचना केल्यात

दरम्यान, समन्वयक तथा जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांचे वेतन देयके एकाच लॉटमध्ये करण्याची मागणी केली. या मागणीस शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ मान्यता दिली. पुढील महिन्यापासून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना वेतन बिल वेळेत व त्रुटीविरहित सादर करण्याच्या सक्त सूचना देण्यात येणार असून संपूर्ण जिल्ह्याचे वेतन एकाच वेळेत अदा होण्यासाठी प्रशासन दक्ष राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, कार्याध्यक्ष पी. ए. पाटील, समन्वयक तथा संचालक तुळशीराम सोनवणे, समितीचे मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल, कार्यकारी सदस्य संतोष कचरे, डॉ. बी. डी. शिरसाठ (धरणगाव), महेंद्र पवार, उपाध्यक्ष गोविंदा पाटील (बोदवड), सुरेश अहिरे, सुनील वानखेडे (भुसावळ), आर एस पाटील, दिनेश पाटील (जामनेर), देवेंद्र तायडे, पी. बी. नरवाडे, प्रदीप सोनवणे उपस्थित होते.

चौकट

प्रतिक्रिया:- सध्या शिक्षक शिक्षकेतरांना एक प्रशासनाकडून जनगणना तसेच बीएलओ च्या माध्यमातून एस आय आर चे काम आणि दुसरीकडे हक्काचे वेतन वेळेवर मिळत नसल्याने प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींना त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी अशा प्रकारे वारंवार निवेदन देणे व त्या माध्यमातून प्रशासनासोबत संघर्ष करणं हे अतिशय दुःखद आहे.

श्री तुळशीराम सोनवणे.
समन्वयक माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *