अमळनेरमध्ये रंगणार हिंदी हास्य-व्यंग्य कवी संमेलनाचा भव्य जल्लोष !  अमृत महोत्सव वर्षानिमित्त साहित्य, विनोद आणि व्यंग्याचा अविस्मरणीय मेळा; नामवंत कवी-शायरांची उपस्थिती
1 min read

अमळनेरमध्ये रंगणार हिंदी हास्य-व्यंग्य कवी संमेलनाचा भव्य जल्लोष ! अमृत महोत्सव वर्षानिमित्त साहित्य, विनोद आणि व्यंग्याचा अविस्मरणीय मेळा; नामवंत कवी-शायरांची उपस्थिती

Loading

अमळनेरमध्ये रंगणार हिंदी हास्य-व्यंग्य कवी संमेलनाचा भव्य जल्लोष !

अमृत महोत्सव वर्षानिमित्त साहित्य, विनोद आणि व्यंग्याचा अविस्मरणीय मेळा; नामवंत कवी-शायरांची उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी :
मराठी वाङ्मय मंडळ व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सव वर्षानिमित्त एका बहुप्रतीक्षित “हिंदी हास्य-व्यंग्य कवी संमेलनाचे” आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, विनोद आणि सामाजिक व्यंग्य यांचा अनोखा संगम अनुभवण्याची पर्वणी या निमित्ताने अमळनेरकर रसिकांना लाभणार आहे.

रसिकांच्या मनाला खळखळून हसवणारा, समाजातील वास्तवावर मिश्कील भाष्य करणारा आणि विचारांना हलकेच चिमटे काढणारा हा साहित्यिक सोहळा शहरातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करणारा ठरणार आहे. हास्याच्या लहरींमध्ये चिंतनाचा गोड स्पर्श अनुभवण्यासाठी रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या भव्य कवी संमेलनात देशभरातील नामवंत कवी आणि शायर सहभागी होणार असून त्यामध्ये
घनश्याम अग्रवाल (हास्य-व्यंग्य, अकोला),
सरीता सरोज (गीत-गजल, नासपुर),
कवी पुष्यक देशमुख (वीर रस, मुलताई),
कपील जैन (यवतमाळ),
शायर दीपक मोहिले (वर्धा)
यांचा समावेश आहे. विविध रसांनी नटलेल्या त्यांच्या सादरीकरणामुळे हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थेची कार्यकारिणी मंडळ विशेष परिश्रम घेत असून कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष डॉ. जोशी अविनाश रघुराज (एम.डी.), उपाध्यक्ष श्री. भांडारकर विवेकानंद लक्ष्मण, डॉ. कुळकर्णी रविंद्र काशिनाथ, कार्यवाह श्री. मगर भैय्यासाहेब अशोकराव, प्रा. पवार श्याम साहेबराव, श्री. साळवी प्रदीप बाळकृष्ण, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. देशपांडे उदय गंगाधर, कार्यकारी सदस्य श्री. भागवत बन्सीलाल आसाराम, श्री. ब्रह्मे सोमनाथ सखाराम, सौ. एकतारे स्नेहा संजय, श्री. घोरपडे संदीप बाबुराव, श्री. अॅड. कुळकर्णी के. व्ही., सौ. लांडगे वसुंधरा दशरथ, डॉ. पाटील महेश रमण, सौ. शहा कांचन प्रकाश, प्रा. तुंटे विजय कुमार, स्वीकृत सदस्य श्री. केले अजय रघुनाथ, तसेच प्रा. डॉ. माहेश्वरी सुरेश रामविलास आणि श्री. सोनार अनिल नारायण यांचा समावेश आहे.

कार्यक्रमासाठी तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर कार्यालयात तिकिटे उपलब्ध आहेत. तिकीट दर ₹१५००, ₹१०००, ₹७०० आणि ₹४०० असे ठेवण्यात आले आहेत.
“प्रथम येणाऱ्यास अग्रक्रमाने प्राधान्य” या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याने रसिकांनी आपली जागा त्वरित निश्चित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📞 संपर्क : ०२५८७-२२२५५०

साहित्य, हास्य आणि व्यंग्य यांच्या अनोख्या संगमाचा आनंद घेण्यासाठी अमळनेरकरांनी या अविस्मरणीय कवी संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *