राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आर. ए. पाटील यांची नियुक्ती
1 min read

राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आर. ए. पाटील यांची नियुक्ती

Loading

राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आर. ए. पाटील यांची नियुक्ती

मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान; विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव प्रतिनिधी :
राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आबासाहेब श्री. आर. ए. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोकजी पवार, प्रदेशाध्यक्ष श्री. प्रफुल्ल पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष प्रा. मंदाकिनी भामरे तसेच सौ. अलका पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रातील कार्य, सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा आणि संघटनात्मक कौशल्य याची दखल घेत आर. ए. पाटील यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. नियुक्तीनंतर उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत अभिनंदन केले.

या निवडीबद्दल खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल दादा पाटील, पारोळा येथील आमदार अमोल दादा पाटील, सौ. तिलोत्तमा पाटील तसेच सौ. रीता बाविस्कर यांनी आर. ए. पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून मानवाधिकार संरक्षण, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आर. ए. पाटील यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *