नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाणेचा दहावीचा शंभर टक्के निकाल; विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी
1 min read

नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाणेचा दहावीचा शंभर टक्के निकाल; विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी

Loading

नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाणेचा दहावीचा शंभर टक्के निकाल; विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी

अमळनेर प्रतिनिधी :
नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाणे ता. अमळनेर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विद्यालयाचा सलग १०० टक्के निकाल कायम राखला आहे. विशेष म्हणजे यंदाही विद्यालयातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्तेची परंपरा अबाधित ठेवली आहे.

या परीक्षेत कु. दर्शना विजय पाटील (रा. रंजाणे) हिने ८८.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. वैष्णवी भरत पाटील (रा. अंतुर्ली) हिने ८६.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कु. भाग्यश्री संजय पाटील (रा. तासखेडा) हिने ८६.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले. या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. एस. ए. पाटील सर, श्री. नानाभाऊ पाटील तसेच वैशाली ताई यांनी स्वतः विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले.

विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या आगळ्यावेगळ्या कौतुक सोहळ्यामुळे विद्यार्थिनींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पालकांनीही विद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाणे हे शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्याचे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *