विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाची किनार लोकमान्य विद्यालयाच्या उत्कृष्ट निकाल* , भाग्यश्री मोरे प्रथम; विद्यार्थ्यांच्या यशाने विद्यालयाचा गौरव
1 min read

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाची किनार लोकमान्य विद्यालयाच्या उत्कृष्ट निकाल* , भाग्यश्री मोरे प्रथम; विद्यार्थ्यांच्या यशाने विद्यालयाचा गौरव

Loading

*विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाची किनार लोकमान्य विद्यालयाच्या उत्कृष्ट निकाल*

भाग्यश्री मोरे प्रथम; विद्यार्थ्यांच्या यशाने विद्यालयाचा गौरव

अमळनेर : येथील लोकमान्य विद्यालयाचा इयत्ता दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल ८१.८१ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यालयातून भाग्यश्री मोरे हिने ८५.२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मानसी कळपे हिने ८१.६ टक्के गुणांसह द्वितीय, तर प्राची पाटील हिने ८०.२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

या यशाबद्दल संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा. डॉ.प्रभाकर जोशी संस्थेचे अध्यक्ष प्रा.धर्मसिंह पाटील यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली व भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *