एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी के. सी. ई. सोसायटी जळगाव अंतर्गत शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
1 min read

एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी के. सी. ई. सोसायटी जळगाव अंतर्गत शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न*

Loading

*एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी के. सी. ई. सोसायटी जळगाव अंतर्गत शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न*

जळगाव दि. ०९/०५/२०२६- के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय व ओरिऑन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला “शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कानास कला ललित केंद्र सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमामध्ये शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मृणालिनी फडणवीस शैक्षणिक संचालक के. सी. ई. सोसायटी जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. सी. ई. सोसायटीचे संचालक डॉ. ए. आर. राणे यांनी केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या शैक्षणिक युगात योग्य करिअरची निवड करताना विविध क्षेत्रांतील संधींचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गौरव पाटील यांनी ए. आय. आणि रोबोटिक्स क्षेत्रातील शिक्षणाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. के.पी.अकोले यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षणाची नवीन दालने विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितली. तसेच डॉ. स्वप्निल काटे यांनी व्यवस्थापन व संगणक क्षेत्रातील शिक्षणाच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. श्रद्धा पाटील यांनी अकरावी व बारावीच्या शैक्षणिक संधी, अभ्यास नियोजन आणि भविष्यातील दिशा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी “शंका समाधान” या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध करिअर क्षेत्रांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाली असून भविष्यातील करिअर निवडीसाठी योग्य दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या सर्व कार्यक्रमासाठी प्रेरणा व मार्गदर्शन के. सी. ई. सोसायटी जळगाव चे अध्यक्ष श्रीमान प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांचे लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेनेच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
कार्यक्रमाचे समन्वयन के.सी.ई. सोसायटी जळगाव चा संचालक डॉ. ए. आर. राणे यांनी केले, तर सहसमन्वयक म्हणून श्रीमती प्रणीता झांबरे मुख्याध्यापिका ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव व श्री श्रीधर सुनकरी मुख्याध्यापक ओरिऑन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल यांनी कार्य पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रणीता झांबरे यांनी अतिशय प्रभावी व उत्कृष्ट पद्धतीने केले.
कार्यक्रमास उपस्थित पालकांनी संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा प्रकारचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत असून भविष्यातही के. सी. ई. सोसायटीने अशा कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था राबवत असलेल्या उपक्रमांचे पालकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *