आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,* *दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन*
![]()
*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,*
*दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन*
जळगांव जिल्ह्यातील आशा सेविका आणि गट प्रवर्तकांना ऑक्टोबर 2025 पासूनचा केंद्र हिस्सा कामाचा थकीत मोबदला अदा करून आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक उपासमार थांबवावी.
मा.आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा योजनेच्या लाभासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थीची असतांना देखील आशा सेविकांना सन 2023 पासूनचा कागदपत्रे आभावी काम करूनही जननी सुरक्षा योजनेचा कामाचा मोबदला अदा केला जात नाहीये सदर अन्याय दूर करून दरमहा जननी सुरक्षा योजनेच्या कामाचा मोबदला अदा करावा.या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
म्हणून यांसह गटप्रवर्तक आणि आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवून होत असलेला अन्याय दूर करावा.
यासाठी मागणीसाठी जळगांव जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे प्रतिनिधी रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. 15 मे 2026 रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करणार असल्याची नोटीस युनियनने जिल्हा परिषद प्रशासनाला दिली आहे.
तरी जिल्ह्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी सदर दिवशी सकाळी 10.00 वाजेपर्यंत जिल्हा परिषद जळगाव येथे एकत्र येऊन धरणे आंदोलन यशस्वी करावे.असे आवाहन श्रीमती कल्पना भोई, सुनंदा पाटील, रविशा मोरे, सुनंदा हडपे, भागीरथी पाटील,भारती नेमाडे,भारती तायडे, सुनीता पाटील,उषा मोरे,नम्रता पाटील,अनिता पाटील यांनी केले आहे.

