डी.आर. कन्या शाळेची घवघवीत यशाची परंपरा कायम एसएससी परीक्षेत 94 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी
![]()
डी.आर. कन्या शाळेची घवघवीत यशाची परंपरा कायम
एसएससी परीक्षेत 94 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी
अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ संचलित नामांकित द्रौपदी रामचंद्र (डी.आर.) कन्या शाळेने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शाळेचा निकाल तब्बल 94 टक्के लागला आहे.
यंदा शाळेतून एकूण 283 विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी 264 विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. यामध्ये
🔹 विशेष प्राविण्यासह – 56 विद्यार्थिनी
🔹 प्रथम श्रेणी – 113 विद्यार्थिनी
🔹 द्वितीय श्रेणी – 64 विद्यार्थिनी
🔹 तृतीय श्रेणी – 31 विद्यार्थिनी
असा उल्लेखनीय निकाल लागला आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी
1. कावेरी मुकेश चौधरी – 92.60%
2. श्रावणी मनेश मोरे – 91.60%
3. गार्गी सुनील जोशी – 90.60%
4. प्रांजल चेतनानंद उपासनी – 89.80%
5. गुंजन दिनेश पाटील – 89.60%


6. भाविका सुरेश वाल्हे – 89.40%
7. तेजश्री ज्ञानेश्वर राजपूत – 88.60%
8. मानसी रमाकांत सैंदाणे – 88.40%
9. प्रतिक्षा विनोद भालेराव – 88.20%
10. कुणाली ईश्वर महाजन – 86.80%
विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे चेअरमन मा. जितेंद्रजी मोहनलाल जैन, खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी पी. पी. जोशी, मुख्य लिपिक एस. एम. पवार, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. माळी, ज्येष्ठ शिक्षिका आर. एस. सोनवणे, आर. एस. येवले मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थिनींचा शालेय बॅग, बुके व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या भावी शैक्षणिक व जीवनप्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
डी.आर. कन्या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, संस्कार आणि सातत्यपूर्ण यश यांचा उत्कृष्ट संगम साधत परिसरात आपला लौकिक पुन्हा अधोरेखित केला आहे.

