कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम इयत्ता दहावीचा निकाल 87.50 टक्के; 14 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी
1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम इयत्ता दहावीचा निकाल 87.50 टक्के; 14 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम

इयत्ता दहावीचा निकाल 87.50 टक्के; 14 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी

धुळे प्रतिनिधी :
साक्री तालुक्यातील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने यंदाही गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखत इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा मार्च 2026 चा एसएससी परीक्षेचा निकाल तब्बल 87.50 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.

या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 16 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयातून
🔹 कु. संजीवनी धनराज सूर्यवंशी (नागझिरी) हिने 84 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
🔹 कु. भूमेश्वरी रतिलाल गायकवाड हिने 82.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला.
🔹 कु. हेमलता सुरेश देसाई हिने 80.20 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम महाजन, सचिव श्री एकनाथ महाजन, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बंशीलाल माळी, शिक्षक श्री काशिनाथ माळी, श्री हिरामण सोनवणे, श्री बाजीराव निकुंभ, श्री रवींद्र सूर्यवंशी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री चेतन महाजन, पंडित खैरनार, सुनील ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याशिवाय गावातील ग्रामस्थ, शिक्षक-पालक संघाचे सदस्य आणि पालकांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करत विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. विद्यालयाने ग्रामीण भागात गुणवत्ता व संस्कार यांचा उत्कृष्ट संगम साधत सातत्याने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *