साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के, यशमित खैरनार तालुक्यात तृतीय; ९० टक्क्यांवरील ११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
1 min read

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के, यशमित खैरनार तालुक्यात तृतीय; ९० टक्क्यांवरील ११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

Loading

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के

यशमित खैरनार तालुक्यात तृतीय; ९० टक्क्यांवरील ११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

अमळनेर : येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत ९६.६३ टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थी यशमित समाधान खैरनार याने ९८.२० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला असून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

शाळेतून द्वितीय क्रमांक पराग धनंजय कापडणीस याने ९७.२० टक्के गुणांसह मिळविला, तर जिग्नेश महेंद्र पाटील याने ९४.४० टक्के गुण मिळवत शाळेत तृतीय क्रमांक पटकावला.

यंदा शाळेतील तब्बल ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत गुणवत्तेची चमक दाखविली. त्यामध्ये आरुष हेमंतकुमार बाविस्कर (९३.६०%), गुरुराज सतीश कागणे (९३.४०%), रुद्राक्ष सूर्यकांत पाटील (९२.६०%), नमन विशाल पाटील (९२.२०%), प्रतिक विनोद शिंदे (९२%), सत्यम गंगासागर वानखेडे (९१.२०%), मनीष चंद्रकांत बारी (९०.८०%) व सार्थक हरीश चौधरी (९०%) यांचा समावेश आहे.

तसेच ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७२ असून ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ९० विद्यार्थी आहेत. या निकालामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व संचालक मंडळ, वर्गशिक्षक श्रीमती विद्या पाटील, डी. ए. धनगर, समाधान पाटील, संदीप निकुंभ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *