साने गुरुजी कन्या हायस्कुलचा दहावीचा निकाल 99.22 टक्के,  यशाची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव
1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कुलचा दहावीचा निकाल 99.22 टक्के, यशाची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कुलचा दहावीचा निकाल 99.22 टक्के

यशाची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी :
“विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो आणि विद्यार्थ्यांचे यश हेच शाळेचे खरे यश असते,” या उक्तीप्रमाणे अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कुलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करत 99.22 टक्के निकालाची अभिमानास्पद नोंद केली आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा यंदाही कायम राखण्यात शाळेला यश आले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळेतून एकूण 129 विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी 128 विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.

निकालाची वैशिष्ट्ये :

🔹 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनी – 13
🔹 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनी – 66
🔹 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनी – 45
🔹 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनी – 17

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनीता बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींसाठी घेतलेले परिश्रम या यशामागे महत्त्वाचे ठरले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. आबासाहेब हेमकांत पाटील, सचिव मा. श्री. दादासाहेब संदीपजी घोरपडे, माजी अध्यक्ष मा. श्री. गुणवंतराव पाटील, शालेय समिती अध्यक्ष मा. प्रा. डॉ. एस. जे. शेख, जेष्ठ संचालक मंडळ, पालकवृंद यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *