ठाणे जिल्ह्यात डिजिटलायझेशनच्या अडचणींवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची अचानक धडक; शिक्षकांच्या पगारासाठी तातडीच्या सूचना
1 min read

ठाणे जिल्ह्यात डिजिटलायझेशनच्या अडचणींवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची अचानक धडक; शिक्षकांच्या पगारासाठी तातडीच्या सूचना

Loading

*ठाणे जिल्ह्यातील डिजिटलायझेशन चे कामामध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत , त्या सोडवून शिक्षक शिक्षकांचे पगार नियमित व्हावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी काल अचानक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयास भेट दिली.*
*शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री देविदास महाजन व पे युनिट अधीक्षका सौ रुपाली खोमणे, तसेच जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी लिपिक यांच्या समवेत बसून एकत्रित चर्चा केली, नियुक्ती दिनांक मध्ये ज्यांची तफावत आहे. त्याचे सर्व प्रस्ताव उपसंचालक कार्याकडे तात्काळ पाठव, पगार बिल ऑनलाईन सादर करताना तांत्रिक अडचण असल्याने सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार न थांबवता ज्याचा प्रॉब्लेम आहे, त्याला पगारातून डिटॅच न करता तात्पुरते वगळावे, व त्यांची तांत्रिक अडचण सोडवून लवकरात लवकर त्यांचाही पगार करावा, तसेच अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जन्मतारीख मध्ये एक मोठी अडचण दिसून येत आहे अठरा वर्षाच्या आत नोकरीला लागल्याची बाब निदर्शनास आलेली आहे, या सर्वांवर तात्काळ मार्ग काढावा याकरता सहाय्यक संचालक श्री पानझडे साहेब यांच्याशीही फोनवरून चर्चा केली परवाच्या बैठकीत सुद्धा समोरासमोर चर्चा केली असून, त्यावरही ते उचित मार्ग काढणार आहेत, कोणीही काळजी करू नये.*
*तसेच शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषदेच्या यादीमध्ये प्रलंबित असलेल्या अनुकंप तत्वाच्या शिक्षक शिक्षकेतरांना तात्काळ रिक्त असलेल्या जागांवर समाविष्ट करून घ्यावे, तसेच त्याचबरोबर अन्य वैयक्तिक विषयांचा चर्चा करण्यात आली.*
*कामानिमित्त उपस्थित पूष्मा संघटनेचे मलिक सर, तुषार म्हात्रे शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे श्री खारीक सर, श्री जीवन जाधव, अजित कांबळे, जाधव सर, श्री एकनाथ आवार सर व अन्य लोक उपस्थित होते*
*– प्रशांत भामरे*
अध्यक्ष कोकण विभाग शिवछत्रपती शिक्षक संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *