“अमळनेरमध्ये पोदार लर्न इंग्लिश मीडियमला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”  भव्य उद्घाटनानंतर प्रवेशासाठी गर्दी; आधुनिक सुविधा, अनुभवी शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विश्वास वाढला
1 min read

“अमळनेरमध्ये पोदार लर्न इंग्लिश मीडियमला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद” भव्य उद्घाटनानंतर प्रवेशासाठी गर्दी; आधुनिक सुविधा, अनुभवी शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विश्वास वाढला

Loading

“अमळनेरमध्ये पोदार लर्न इंग्लिश मीडियमला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”

भव्य उद्घाटनानंतर प्रवेशासाठी गर्दी; आधुनिक सुविधा, अनुभवी शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विश्वास वाढला

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील गलवाडे रोडवरील पोदार लर्न स्कूल या नव्या इंग्लिश मीडियम शाळेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या शुभहस्ते नुकताच शाळेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोदार स्कूलची निवड करत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे.

शहरातील आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून पोदार स्कूलकडे पाहिले जात असून, शाळेची भव्य-दिव्य इमारत, सुरक्षित वातावरण, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि तंत्रज्ञानयुक्त शिक्षण पद्धती यामुळे पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
यावेळी बोलताना शाळेच्या चेअरमन डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगितले की, “उद्घाटनानंतर मिळालेला पालकांचा प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आधुनिक शिक्षणासोबत संस्कारक्षम वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.”
शाळेचे संचालक मा. प्रशांत सूर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सुरक्षित आणि आनंददायी वातावरण देण्याचा संकल्प व्यक्त केला.
पोदार स्कूलच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्वच्छ, हवेशीर आणि सुसज्ज वर्गखोल्या तयार करण्यात आल्या आहेत. पिण्यासाठी शुद्ध R.O. पाणी, C.C.T.V. सुरक्षा व्यवस्था, आकर्षक वर्गरचना, तसेच वाहन व बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, 98 वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पोदार समूहाच्या भारतभर 273 पेक्षा अधिक पार्टनर स्कूल्स कार्यरत असून, शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवामुळे पोदार हे नाव पालकांसाठी विश्वासाचे प्रतीक बनले आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन फीमध्ये 50 टक्के सूट देण्यात आली होती, प्ले ग्रुप ते इयत्ता चौथीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणासोबत भारतीय संस्कृतीचे जतन करणारे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमही शाळेत राबविण्यात येणार आहेत.

प्रवेशासाठी संपर्क :

पोदार कॅम्पस, स्वादिष्ट नमकीन जवळ, गलवाडे रोड, अमळनेर – 425401
📞 9175675651 / 8668412723

कार्यालयीन वेळ :
सोमवार ते शनिवार — सकाळी 9 ते सायं. 4 बजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *