समर्पण, कर्तृत्व आणि संस्कारांचा प्रवास पूर्ण : डी. ए. सोनवणे सरांना भावपूर्ण निरोप  ,इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनोख्या भेटीने सोहळ्यात भर  ,संस्थेचे संचालक मंडळ शाळेतील कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी केला सोनवणे सरांचा सन्मान..
1 min read

समर्पण, कर्तृत्व आणि संस्कारांचा प्रवास पूर्ण : डी. ए. सोनवणे सरांना भावपूर्ण निरोप ,इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनोख्या भेटीने सोहळ्यात भर ,संस्थेचे संचालक मंडळ शाळेतील कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी केला सोनवणे सरांचा सन्मान..

Loading

समर्पण, कर्तृत्व आणि संस्कारांचा प्रवास पूर्ण : डी. ए. सोनवणे सरांना भावपूर्ण निरोप

इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनोख्या भेटीने सोहळ्यात भर

संस्थेचे संचालक मंडळ शाळेतील कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी केला सोनवणे सरांचा सन्मान..

अमळनेर (प्रतिनिधी) :
येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री डी. ए. सोनवणे सर यांनी तब्बल ३४ वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली. यानिमित्त आयोजित सेवापूर्ती सोहळा भावनिक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ओमप्रकाश (भाऊ) नारायणदास मुंदडा (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंदडा फाउंडेशन व मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अमळनेर) होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. दिगंबर विठ्ठलराव महाले (अध्यक्ष, मंगळ ग्रह सेवा संस्था, प्रदेश सरचिटणीस – व्हॉईस ऑफ मीडिया, महाराष्ट्र) उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थापक एस. टी. पाटील, सचिव नरेंद्र राजूभाऊ मुंदडा, सहसचिव योगेश भाऊ मुंदडा, संचालक राकेश भाऊ मुंदडा, मुख्याध्यापक संदीप पवार, प्रभाकर विंचुरकर, धनराज महाजन, परिवेक्षक डी. एन. पाटील, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय डी. ए. बहिरम, पी. एल. मेखा, विनोद कदम, आशाताई महाले, वैशाली कदम, मंगला चव्हाण, सीईओ आर. जी. चव्हाण, बाळा पवार, माजी उपनगराध्यक्ष सोमा दादा महाजन, विनोद जाधव, पांडुरंग अण्णा महाजन, आर. डी. जोशी, लता पवार, रवींद्र देवरे, विजय बिऱ्हाडे, मगन डीगंबर ठाकरे गुरुजी, राजू बिऱ्हाडे, अभय बोरसे, आत्माराम अहिरे, पत्रकार अजय भामरे, उमेश काटे, सोपान भवरे, ईश्वर महाजन, बापूराव ठाकरे, डी. ए. पाटील, प्रा. अशोक पवार, अशोक बिऱ्हाडे आदींची लक्षणीय उपस्थिती होती.

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. श्रीमती शशिकला सोनवणे यांनी सुमधुर सरस्वती स्तवन सादर केले. त्यानंतर सोनवणे परिवारातर्फे सर्व मान्यवरांचा स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनोगतांच्या सत्रात डी. एन. पाटील यांनी सरांसोबतच्या सहवासातील अनुभव सांगत जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण करून दिली, तर अंजली बागले यांनी काकांनी पित्याची उणीव भासू दिली नाही, असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. चित्रांजली वसईकर यांनी काकांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे जीवनाला दिशा मिळाल्याचे नमूद केले. एस. टी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या घडणीत सरांचे योगदान अधोरेखित केले, तर विनोद वसईकर (आरटीओ, नाशिक) यांनी सरांच्या संस्कारांमुळे वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले. सौ. सुशीला अहिरे-सोनवणे यांनी कौटुंबिक संघर्षातही शिक्षकी सेवेत मिळालेल्या यशाबद्दल भावनिक मनोगत व्यक्त केले.

स्वतःच्या मनोगतात डी. ए. सोनवणे सर यांनी १९८७ पासून शाळेचा झालेला प्रवास, १९९२ पासूनची स्वतःची सेवा आणि आजपर्यंत सुमारे ९०६० विद्यार्थ्यांना ज्ञानदान केल्याचा अभिमान व्यक्त केला. भाड्याच्या घरातून सुरू झालेल्या शाळेने आज घेतलेली भरारी त्यांनी समाधानाने मांडली. अध्यक्षीय भाषणात श्री प्रकाश भाऊ मुंदडा यांनी गरिबीवर मात करत सोनवणे सरांनी विद्यार्थ्यांना घडवले, हे अधोरेखित करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि शाळेसाठी दिलेले योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले.

या प्रसंगी पत्रकार ईश्वर महाजन यांनी सोनवणे सरांवरील विशेष पुरवणी प्रकाशित केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, तर उमेश काटे यांचाही संविधान प्रत देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. भारती चव्हाण व प्रवीण ठाकरे यांनी केले. सोहळ्याचा उत्कर्षबिंदू ठरला तो म्हणजे सोनवणे परिवाराकडून देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटरसायकलची अनपेक्षित भेट, ज्यामुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पाटील, जगदीश पाटील, शिवाजी पाटील, प्रमोद महाजन, रवींद्र चौधरी, धर्मेंद्र पाटील, रूपाली महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.

एकूणच, हा सेवापूर्ती सोहळा केवळ निरोपाचा नव्हता, तर एका आदर्श शिक्षकाच्या समर्पित जीवनकार्याचा कृतज्ञतेने साजरा केलेला उत्सव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *