दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण
1 min read

दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण

Loading

दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण

अमळनेर (प्रतिनिधी) – फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत एन. मुंदडा कॉलेज, अमळनेर येथील विद्यार्थिनी दिव्या रविंद्र पाटील हिने 86.83% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिव्या ही शिक्षक रविंद्र सुकदेव पाटील यांची कन्या असून, लहानपणापासूनच अभ्यासू, शिस्तप्रिय आणि जिद्दी वृत्तीची आहे. तिच्या मेहनतीमुळे आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे तिने हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिव्याच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *