अमळनेर भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व; शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांची घोषणा*
1 min read

अमळनेर भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व; शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांची घोषणा*

Loading

*अमळनेर भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व; शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांची घोषणा*

अमळनेर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी अमळनेर येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे शहरासह ग्रामीण भागातील संघटनाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.यावेळी अमळनेर शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी राहुल मगन चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच जानवे मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी हिरालाल आनंदा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पातोडा मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी निखिल रमेश धनगर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे युवा मोर्चात नवचैतन्य निर्माण होऊन संघटन विस्ताराला अधिक वेग मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. युवकांनी समाजहित, राष्ट्रहित व जनकल्याणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत पक्षाची विचारधारा तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित प्रदेश चिटणीस सौ.भैरवी वाघ पलांडे जिल्हाध्यक्ष श्री.डॉ राधेश्याम चौधरी,जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोडा मंडल अध्यक्ष श्री.राहुल पाटील, शहराध्यक्ष श्री.योगेश महाजन,जिल्हा पदाधिकारी श्री. व्ही.आर.पाटील,श्री.लालचंद सैनानी,श्री.महेंद्र पाटील, श्री निवास मोरे, डॉ अनिल शिंदे,महेशराव पाटील,श्याम अहिरे,भिकेश पाटील,हिरालाल पाटील,नगरसेवक विजय राजपूत,भरत परदेशी,श्री.तुळशीराम हटकर, श्री.बाळू पाटील,श्री.श्याम पाटील,श्री.संदिप पाटील,राकेश पाटील, राहुल पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, विजय पाटील आदी कार्यकर्त्यांनी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्षविस्तारासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *