साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी करणार जनगणनेला सहकार्य :– , *स्वगणना प्रमोटर्स म्हणून विदयार्थ्यांना प्रोत्साहन*—
1 min read

साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी करणार जनगणनेला सहकार्य :– , *स्वगणना प्रमोटर्स म्हणून विदयार्थ्यांना प्रोत्साहन*—

Loading

साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी करणार जनगणनेला सहकार्य :–

*स्वगणना प्रमोटर्स म्हणून विदयार्थ्यांना प्रोत्साहन*—

कळमसरे ता. अमळनेर :-(प्रतिनिधी )
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने जनगणना सारख्या राष्ट्रीय कार्याला हातभार लावण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्वतःच्या घराची व आपल्या जवळच्या किमान दहा घरांची स्वगणना करण्याची जबाबदारी हाती घेतली आहे.

स्वगणना प्रमोटर्स म्हणून विदयार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे आपल्या सानेगुरुजी शाळेचे स्वगणना प्रमोटर म्हणून ओळखले जाणार आहोत. यासाठी साने गुरुजी विद्यालयातील साधारण 500 विद्यार्थी स्वगणना प्रमोटर्स म्हणून कार्य करणार आहेत.

*विद्यार्थी काय करणार?*
त्याकरिता विद्यार्थ्यांना दिलेल्या लिंक वर
se.census.gov.in
या लिंक ला टच करून आपल्या घराची जनगणना स्वतःच करून घेतील. विध्यार्थ्यांना मोबाईल वरच सर्व काही करावयाचे असल्याने त्यांना हे काम करताना अगदी सोपे जाणार असल्याचेही साने गुरुजी विद्यालयाचे सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, उपशिक्षक तथा जनगणना प्रशिक्षक डी. ए. धनगर यांनी सांगितले. स्वगणना या पद्धतीने सानेगुरुजी विद्यालयाचे जनगणना प्रणालीला मोठे सहकार्य लाभणार असल्याने त्यांना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आपण मदत करावयाची आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील जनगणनेची स्वगणना पायरी उच्च अंकी संख्येने पूर्ण होणार असल्याने साने गुरुजी विद्यालयातील 500 विद्यार्थीना या राष्ट्रीय जनगणना साठी सानेगुरुजी विद्यालयाचे सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, उपशिक्षक डी. ए. धनगर यांचे मार्गदर्शन लाभले असून या स्तुत्य उपक्रमात साने गुरुजी विद्यालयाने उत्कृष्ट सहभाग घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *