विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमळनेर–जळोद बस सुरू करा; अन्यथा मनसेचा इशारा , अमळगाव गांधीलीतील विद्यार्थ्यांचे हाल; आगर प्रमुखांना निवेदन
![]()
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमळनेर–जळोद बस सुरू करा; अन्यथा मनसेचा इशारा
अमळगाव गांधीलीतील विद्यार्थ्यांचे हाल; आगर प्रमुखांना निवेदन
बातमी :
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना वाहतुकीअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लासूर बस त्या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.
या पार्श्वभूमीवर अमळनेर ते जळोद तसेच अमळगाव गांधीली मार्गावर सकाळी ८ वाजता विशेष बस सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगर प्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष महेश सुतार, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी, तालुका सचिव निलेश भावसार, शहर उपाध्यक्ष आदित्य दोरकर, जय बोरसे तसेच मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

