अमळनेरमधील पूरग्रस्त भागाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर, प्रशासनाला आदेश
1 min read

अमळनेरमधील पूरग्रस्त भागाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर, प्रशासनाला आदेश

Loading

अमळनेरमधील पूरग्रस्त भागाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर, प्रशासनाला आदेश

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची आज खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.

 

 

 

 

 

 

 

 

 

खासदार स्मिताताई वाघ यांनी अतिवृष्टीनंतर तत्काळ जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी मयूर भंगाळे तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे , गटविकास अधिकारी एन आर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, तसेच जे नागरिक बेघर झाले आहेत, अशा सर्व प्रकरणांचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमांनुसार मदत मिळण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आज प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांशी संवाद साधताना, “या संकटाच्या काळात आपण एकटे नाही. शासन आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. प्रत्येक पात्र नुकसानग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नुकसानग्रस्त नागरिकांनीही खासदारांनी तातडीने दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावरली भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहर अध्यक्ष योगेश महाजन, पातोंडा अध्यक्ष राहुल पाटील, नगरसेवक बाळू पाटील, नगरसेवक विजय पाटील, माजी अध्यक्ष हरचंद लांडगे,हिरालाल पाटील,राकेश पाटील,दीपक भोई,मच्छिंद्र लांडगे, सरचिटणीस देवा लांडगे,युवा मोर्चा राहुल चौधरी, हिरालाल पाटील,कल्पेश पाटील, राजेश खरारे आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *