राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार
![]()
राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार
अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट
शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार
मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील 4860 पदांची तात्काळ भरती करण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने शाळांमध्ये पुन्हा पीटीच्या तासाची घंटा वाजणार आहे
क्रीडा शिक्षकांच्या या प्रश्नाबाबत भाजपा प्रदेश कार्यकारिणी चे निमंत्रित सदस्य व शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे आणि कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यात मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत शिक्षण राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे दि. 29 एप्रिल 2026 पासून आझाद मैदान, मुंबई येथे 4860 शारीरिक शिक्षकांच्या नेमणुकीसाठी “बेमुदत धरणे आंदोलन” आयोजित केले होते. या आंदोलनात दि. 2 जानेवारी 2026 च्या जीआर ची अंमलबजावणी करावी, टेट 2025 उत्तीर्ण उमेदवारांचे समायोजन आणि 4860 पदांची तात्काळ भरती करावी अशी मागणी करण्यात आली होती
शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शेकडो सेवानिवृत्त व बेरोजगार क्रीडा शिक्षकांना दिलासा मिळाला असून, आंदोलन सन्मानाने स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतला असून अनिल बोरनारे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच आज शासन दरबारी ‘क्रीडा शिक्षक’ हा विषय ऐरणीवर असल्याचे शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट चे प्रमुख कार्यवाह व महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघाचे मुंबई विभाग समन्वयक डॉ. जितेंद्र लिंबकर यांनी सांगितले

