चिमुकल्यांनी भाषणातून केले महापुरूषांच्या कार्याचे स्मरण*, *सरस्वती शिशुवाटीका येथे स्मृतीस केले अभिवादन*
![]()
*चिमुकल्यांनी भाषणातून केले महापुरूषांच्या कार्याचे स्मरण*
*सरस्वती शिशुवाटीका येथे स्मृतीस केले अभिवादन*
*अमळनेर प्रतिनिधी -* थोर समाज सेवक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती येथील सरस्वती शिशुवाटीका येथे साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून या महापुरूषांच्या कार्याचे स्मरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने करण्यात आली.त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस श्री दिनेश नाईक यांच्या हस्ते
माल्यार्पण व पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी प्रियंका बनसोडे,राधिका मोरे,
नीरज बाविस्कर,तन्मयी पाटील,हर्षाली संदानशिव
दिशान सोनवणे या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील बोधपर गोष्टी सांगितल्या.
कार्यक्रमास सौ.किरण भदाणे,सौ.माहेश्वरी राजपूत,सौ.काजल राठोड,सौ.आम्रपाली संदानशिव यांची उपस्थिती होती. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

