ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा
1 min read

ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा

Loading

ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सहाय्यक ग्रंथपाल श्री. मधुकर बाळापूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,
विश्वस्त चंद्रकांत नगांवकर, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, संचालक दिपक वाल्हे तसेच विशेष उपस्थिती म्हणून तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव येथील श्री. विलास वाल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला तसेच वाचन संस्कृतीच्या जतनासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *